Explore

Search

April 4, 2025 7:52 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वर आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई .

 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी केली अटक.

सातारा प्रतिनिधी ; सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 साला पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता. तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर मंत्री गोरे यांना दहा दिवस जेलमध्येही जावं लागलं, असं सदर महिलेने एका पत्रात म्हटलं होतं.

2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी मागितली होती, असा आरोप आता केला जात आहे. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

मंत्री जयकुमार गोरे यांना जेल मध्येही जाव लागल या प्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा ही दिला होता , अशी माहिती असताना देखील आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पिडीत महिलेने केली आहे . २०१६ मधील दाखल तक्रार आता २०२५ मध्ये व्हॉटसऐप ग्रुप वर व्हायरल करण्यात येत आहे . यामुळे आपले नाव आता उघड झाल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे . तर आपल्यावर दबाव आणण्यासाधी दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार मंत्री गोरे यांनी आपल्या पी.ए. मार्फत केल्याचा दावा ही या महिलेने केला होता.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली . या महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी मागणी केली होती . 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक .

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy