सातारा जिल्ह्याच्या सुकन्या सध्या पुणे महानगर विकास प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .
सातारा प्रतिनिधी ; पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे (वय 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई डॉ. भारती बर्गे आणि बहीण पल्लवी बर्गे असा परिवार आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
स्नेहल बर्गे यांची कारकीर्द अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली, त्यांनी काही काळ सातारा उपविभागीय प्रांतधिकारी म्हणून जवाबदारी पार पडली होती .अवैध गौणखनिज उत्खनन अवैध वाहतुकीवर त्यांनी कडक कारवाई करून त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या बहीण पल्लवी बर्गे या सध्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
