सातारा तालुक्यातील गुणवंत युवकांची PCMC अग्नीशामक दला मध्ये फायरमन पदी निवड
सातारा प्रतिनिधी : शुराविरांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सातारा जिल्ह्यातील युवक प्रथमेश उमा रवींद्र शितोळे रा. (मो.ओढा.) , संकेत धर्मू सरडे रा. ( आकले ), रोहन रमेश इंगवले रा.(किडगाव ), ओंकार कदम रा.(मानेवाडी) यांची अधक परिश्रमा- नंतर पुणे पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथील अग्निशामक दलामध्ये फायरमन पदी निवड झाली .
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो. मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. अश्या या कष्टकरी तालुक्यातील यशस्वी युवकांचे हार्दिक अभिनंदन . त्यांच्या या यशाचे सर्व श्रेय त्याचे आई – वडील , मागर्दर्शक , शिक्षक व मित्रपरिवार यांना मिळतो . युवकांच्या या यशाचे काल फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून सातारा शहरात उत्सहात -जल्लोषात स्वागत केले.
यावेळी कै. विकीभाऊ शिंदे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय अरुणराव शिंदे , प्रथमेश साबळे , आदित्य निकाळजे , अभी शेलार, विक्रांत पवार , ओम इंगवले, अजिंक्य धुमाळ , धनराज साळुंखे , सुमित यादव , अक्षय शिंगरे , अक्षय डोळस , ऋषिकेश यादव, पंकज गिरीगोसावी, सरकार बीजेनेस ग्रुप सातारा व पालक – मार्गदर्शक आदि उपस्थित होते.
