नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार पत्नी प्रतिभा पवार आणि जावईबापू सदानंद सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब जय पवार आणि ऋतुजा पाटीलच्या साखरपुड्यासाठी उपस्थित.
प्रतिनिधी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा काल (10 एप्रिल) साखरपुडा पार पडला. पुण्यातील अजित पवारांच्या फार्महाऊसवर या साखरपुडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्तानं अवघं पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं आहे. जय पवार यांच्या साखरपुड्यातील सोहळ्याचे सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासोबतचे काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या घरच्या सूनबाई होणार आहेत.
नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार पत्नी प्रतिभा पवार आणि जावईबापू सदानंद सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब जय पवार आणि ऋतुजा पाटीलच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होते.
साखरपुड्याचा हा सोहळा राजकीय मंचावरील निर्माण झालेली काहीशी कटूता कमी करुन पवार काका-पुतण्यांच्या कुटुंबातील गोडवा वाढवणार का ?
