जात, भाषा, प्रदेश या आधारे बहुजन समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे ?
संपादकीय ; महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित जो चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यास ब्राह्मण महासभेने सेन्सॉर बोर्डाला काही दृश्य बाबत आक्षेप नोंदवला आहे.
खरंतर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो महाराजांचा इतिहास सुद्धा बदलण्याचा प्रयत्न काही ब्राह्मणवादी विचारांच्या वतीने सुरू आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९४८ साली स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारं खुली केली हा इतिहास सर्व सर्वक्षुत असताना त्या इतिहासात बदल करण्यात कोणत्या व्यवस्थेचा त्याचा धक्का बसणार आहे म्हणून हा विरोध होतोय असा प्रश्न आहे.
आज ब्राह्मणवादी विचारांना विरोध करणारे बहुजन असंघटित कसे होतील असा प्रयत्न आजच्या काळात चालू असल्याचे दिसत आहे.दुर्दैवाने वर्चस्वादी जातीय विचारांची सत्ता राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणामध्ये असल्याने सामाजिक व्यवस्थापन बिघडण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
राजकीय पक्ष विचारवंत, राजकारणी जेव्हा अशी माणसे वर्चस्ववादाच्या प्रलोभनाला बळी पडून नवा वाद निर्माण करण्याचा दिवसेंदिवस प्रयत्न करित आहेत. पुरोगामी विचाराला पाठबळ देणारे अनेक क्षेत्रांमधील लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात त्याचा परिणाम दिसून येत आहे . उदा. आज जे महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त प्रदर्शित होणार्या चित्रपटातील काही दृश्य वगळून आक्षेप व हरकती नोंदविले आहेत त्यामुळ मूळइतिहास बदलण्याचा हा खटाटोप चालू आहे का असा प्रश्न उपस्तीथ होत आहे. तसेच आज “मी नथुराम गोडसे” बोलतोय अशा नाट्य प्रयोगांना विरोध होत नाहीत.असे मत नुकतेच एका youtub वरील मुलाखतीमध्ये विश्लेषक श्री . राजू परुळेकर यांनी केले आहे बहुजन समाजामध्ये असंघटित पणा कसा राहील याचा पुरेपूर प्रयत्न वर्चस्ववादी राजकीय सत्ता व नेते करताना दिसून येतात .राज्याच्या मुख्य प्रश्नाकडे सोयस्कर कानाडोळा करून सामाजिक असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे…
मराठा समाजाला इतर समाजापासून दूर करणे आज पुन्हा इतर मागासवर्गीय समाजाला वादातील कसे ठरवता येईल याचा प्रयत्न करणे त्याचे उदाहरण म्हणजे ज्या छत्रपतींनी रयतेचे व्यवस्थापन सामाजिक व आर्थिक दृष्ट्या स्वराज्य समृद्ध व्हावे यासाठी सर्व बहुजन जाती व्यवस्थेला सोबत घेऊन काम केले त्यालाच विरोध आज राजघराणातील व्यक्तींच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा इतिहासात बद्दल करण्यासाठी होताना दिसते हे दुर्दैव आहे.
अशा विचारांना केवळ यशवंत विचारांची पाठराखण करणारे नेतृत्व पुढे येऊन पुरोगामी महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, आर्थिक संघटन बांधले जावे यासाठी बहुजन समाजाच्या वतीने शाहू, फुले ,आंबेडकर यांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे पाईक पुढे येणे ही काळाची गरज बनली आहे…
अमित कदम ..( संपादक ;रयत दर्पण न्यूज )
