कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घ्या :
तुमच्या कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे तुमच्याकडे योगा क्लासला जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घेऊ शकता. घर किंवा ऑफिसचे काम करताना 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि त्या दरम्यान तुम्ही खुर्चीवर, डेस्कवर किंवा जमिनीवर बसून योगाभ्यास करू शकता. खुर्चीवर बसून हात आणि पायाचे व्यायाम करू शकता.
नियमितपणे सराव :
कोणत्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी त्याचा नियमित सराव करणे गरजेचे असते. सुरूवातीला कठीण योगासनांचा सराव करणे टाळा आणि साधी योगासने तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.
झोपण्यापुर्वी कोणते योगा करावे :
दिवसाची सुरुवात करण्यासाठी सूर्यनमस्कार करावा आणि बेडवर झोपताना काही सोपे योगा करावे. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी वज्रासनात बसावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि झोपही सुधारते. यासोबतच शवासन, बालासन केल्याने मेंदू शांत होण्यास आणि चांगली झोप येते.
