,11 जून रोजी पोलीस बंदोबस्तात ढाबळ काढणार, मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
सातारा : शनिवार पेठ येथील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ उद्यानातील कबुतरांच्या ढाबळ प्रकरणावर अखेर चर्चेने पडदा पडला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर 11 जून रोजी पोलीस बंदोबस्तात हे ढाबळ हटवण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले . यावेळी त्यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, माजी नगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, तसेच सदाशिव पेठेतील काही नागरिक उपस्थित होते . शनिवार पेठेतील कबुतरांच्या ढाबळ प्रकरणावरून सातारा विकास आघाडी , नगर विकास आघाडी, दोन्ही आघाड्या आमने-सामने आल्या होत्या माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी ढाबळ हटवावी या मुद्द्यावरून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण केले होते, मात्र मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने चर्चा होऊ शकले नव्हती.
सोमवारी पुन्हा स्मिता घोडके यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या कक्षा बाहेर ठिय्या दिला मुख्याधिकारी बापट यांनी स्मिता घोडके यांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेदरम्यान कबुतरांची ढाबळ जिजाऊ उद्यानातून हटवली जावी अशी मागणी केली मात्र पोलीस बंदोबस्त आचारसंहितेमुळे उपलब्ध न झाल्यामुळे कबुतरांची ढाबळ काढता आली नाही असे स्पष्टीकरण त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिले. चार जून रोजी सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आहे त्या कारणाने पोलीस विभागाकडून बंदोबस्त उपलब्ध होणे शक्य नाही मतमोजणी तसेच आचारसंहिता संपताच नजीकच्या काळात म्हणजे 11 जून रोजी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीस बंदोबस्ताच्या संदर्भातील पत्रव्यवहार सुद्धा आपल्याशी केला जाईल असे स्पष्ट आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी स्मिता घोडके यांना दिले
या प्रकरणामुळे ढाबळ प्रकरणावर आता सध्या तरी पडदा पडलेला आहे. नगर विकास आघाडीने ढाबळ प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली शनिवार पेठेतील ढाबळ हटवण्यापेक्षा सातारा शहरातील अतिक्रमणे मुख्यत्वाने हटवा अशी मागणी माजी नगरसेवक जयवंत भोसले यांनी केली आहे. या प्रकरणाला सध्या चर्चेचा अर्धविराम मिळाला असला तरी ढाबळ प्रकरणाने दोन्ही या गाड्यांमधील वादाचे कंगोरे पुन्हा वाढले आहेत.
