शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई, नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : घरफोडी प्रकरणातील आरोपी शाहूपुरी पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 18 तासांमध्ये जेरबंद केला. त्याच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा नऊ लाख दहा हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आदित्य सुभाष कापसे वय 19 राहणार रा ९१, शुक्रवार पेठ असे सदर आरोपीचे नाव आहे
दिनांक 26 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तपासाला सुरुवात केली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला गती दिली . गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जाऊन माहिती घेत होते त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा शुक्रवार पेठ सातारा येथील असल्याची माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
कापसे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या 18 तासांमध्ये आरोपीला जेरबंद करण्यास यश मिळवले त्याच्याकडून चोरीला गेलेले 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 96 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा नऊ लाख दहा हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी भाग घेतला होता.
