Explore

Search

April 19, 2026 11:17 pm

लेटेस्ट न्यूज़

Mumbai Actor News : सनी देओलवर निर्मात्यानं केला फसवणुकीचा आरोप

सनी देओलवर निर्मात्यानं केला फसवणुकीचा आरोप

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सनी देओल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडला आहे. चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी सनी देओलवर फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून घेऊयात…

सनी देओलवर गंभीर आरोप :

2016 मध्ये एका चित्रपटासाठी सौरव गुप्ता यांनी सनी देओलसोबत संपर्क साधला होता. सनीनं तो चित्रपट साइन केला, अॅडव्हान्स पैसे देखील घेतले पण काम सुरू केले नाही, असा आरोप सौरव यांनी सनीवर केला आहे.

सौरव म्हणले, सनीनं विश्वासघात केला :

सौरव गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “सनी हा चित्रपट सतत पुढे ढकलत होता. पैसे घेऊनही तो काम सुरु करत नाही. आम्ही त्याला सायनिंग अमाउंट म्हणून 1 कोटी रुपये दिले होते. आमचा चित्रपट सुरू करण्याऐवजी त्याने 2017 मध्ये पोस्टर बॉईजमध्ये काम केलं. मी त्याला 2.55 कोटी रुपये दिले आणि त्याच्या बोलण्यावरुन चित्रपटाचा स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकही बदलला. शूटिंग सुरू करण्यासाठी आम्ही स्टुडिओही बुक केले, पण सर्वकाही व्यर्थ गेले. त्यानं आणि त्याच्या टीमने आमचा विश्वासघात केला आहे.”

“आम्ही सायनिंग अमाऊंट 4 कोटी रुपये निश्चित केली होती, परंतु जेव्हा आम्ही त्यांचा करार पाहिला तेव्हा ती रक्कम 8 कोटी रुपये होती. नफा वाटणीची रक्कम म्हणून त्यांनी 2 कोटी रुपये जोडले. जेव्हा मी या गोष्टी सनीच्या टीमला सांगितल्या तेव्हा त्यांच्या टीमने आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. आम्ही नोटीसही पाठवली, पण तो देशात नसल्याचे त्याच्या टीमने सांगितले.”, असंगी सौरव गुप्ता यांनी सांगितलं.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy