Explore

Search

April 23, 2025 1:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Khandala Accident News : खंबाटकी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागेवरच उलटा फिरला

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावर एक विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खंबाटकी घाट उतरल्यानंतर सातारा बाजूकडे असणाऱ्या वेळे (ता. वाई) गावाच्या हद्दीत असण्याऱ्या घाट उताराच्या तीव्र वळणावर भर पावसात एक कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. यामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

याबाबत माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाट उतरल्यानंतर वेळे गावाच्या हद्दीत पावसाच्या निसरड्या रस्त्यावर कंटेनर (गाडी क्रमांक एमएच ०९ . एफएल ११०५) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागेवरच उलटा फिरला. यावेळी कंटेनरचे तोंड विरुद्ध बाजूला झाले. सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला. तसेच इतरही वाहनांचा अपघात घडला नाही. यावेळी रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक असल्याने मोठा अनर्थ टाळला. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy