सातारा : वाढे ता. सातारा येथे एसटी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एसटी चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांडूरंग सिदु सावंत (वय 52, सध्या रा.सातारा) याच्या विरुध्द नितीन अविनाश पवार (वय 36, रा. आरफळ ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 22 जून रोजी हा अपघात झाला आहे. तक्रारदार नितीन पवार यांचा मित्र सुरज राजेंद्र बोडके (वय 25, रा. आरफळ) याच्या दुचाकीला एसटीची धडक बसली. या अपघातात सुरज बोडके पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
