संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण? मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संभाजीनगर विभागीय आयुक्तांना एक निवेदन मिळाले आहे. धनराज गुट्टे या व्यक्तीने हे निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. या निवेदनात जरांगे हे चुकीच्या मागण्या करीत आहेत आणि जातीय ते निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
आत्मदहन करण्याचा इशारा :
धनराज गुट्टे यांनी निवेदनात जर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिवालय कार्यालयाला पाठवले आहे.
पोलीस आयुक्तांनी पाठवलेले पत्र :
या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये जरांगे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस विभागासह यंत्रणा हादरली आहे. यामुळे येणाऱ्या जरांगे यांच्याविरुद्ध काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (सोर्स – माधव सावरगावे, साम टिव्ही प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर)
