Explore

Search

April 21, 2026 11:59 pm

लेटेस्ट न्यूज़

Crime News : तडीपारीच्‍या उल्लंघनप्रकरणी कुख्यात गुंडास अटक

सातारा : शहर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडास पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांतून हद्दपार केले होते.

मात्र, तरीही तो त्याच्या गावी आल्याने त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कराड) असे संबंधिताचे नाव असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी, की शहर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडाने शहरात विविध प्रकारचे गुन्हे करून त्याच्‍यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो प्रशासन व न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करीत होता.

त्यामुळे त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याकडून पाठवला होता. प्रस्तावाच्‍या चौकशीनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांतून हद्दपार केले होते. त्यामुळे त्या आदेशाची अंमलबजावणी करून खोपोली, येथे सरकारी इतमामात सोडून संबंधित पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली होती.

दरम्‍यान, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक निरीक्षक गणेश कड व पोलिस अंमलदारांना तडीपार गुंडांच्या हालचाली पडताळण्याच्या सूचीत केले होते.

तडीपार असतानाही अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कराड) हा त्याच्‍या गावी येऊन राहिल्‍याची माहिती शहर पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अंमलदारांना सदर बातमीची खातरजमा करून कारवाई करण्‍याचे आदेश दिले.

त्यानुसार सहायक फौजदार संजय देवकुळे, हवालदार अमित पवार, आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी आज काल विरवडे गावी जाऊन तडीपार अक्षय नाटकर याची खात्री केली. त्या वेळी तो दिसला आणि पोलिसांना ओळखून तो पळून जात असताना त्यास शिताफीने पकडले. त्या वेळी पोलिसांनी त्याचेकडे परवान्याबाबत खात्री करून ताब्यात घेऊन अक्षय नाटकर यांस अटक केली आहे.

कराड शहर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार, तसेच हद्दपार गुंडांच्या हालचाली पडताळून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे कोणी निष्पन्न झाल्‍यास यापुढील काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल. के. एन. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy