Explore

Search

April 21, 2026 11:59 pm

लेटेस्ट न्यूज़

Satara News : उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

सातारा : सातारा पोलीस दलातील पाटण येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व सध्या जात पडताळणी अधिकारी विवेक लावंड यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करीत सेवापूर्ती समारंभ सातारा येथे संपन्न झाला.
मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण गावचे विवेक लावंड यांनी पोलीस दलात एकूण 36 वर्ष सेवा बजावली. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेस प्राधान्य देत आपली संपूर्ण सेवा बजावली. 30 जून रोजी ते आपली 36 वर्ष सेवा संपवून सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांचा सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांनी विवेक लावंड यांना पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे व आरोग्यदायी जावे यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लावंड यांच्या सेवा कालावधीचे सन्मानपत्र वाचन करण्यात आले. सन्मानपत्र वाचन होताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. गरिबांसाठी कायम सढळ हाताने मदत करणारे अधिकारी म्हणून लावंड यांच्याकडे पाहिले जाते. कायद्याचे रक्षण करताना कोणावर अन्याय होऊ दिला नाही. वर्दीतील दर्दी माणूस म्हणून लावंड यांच्याकडे पाहिले जाते.
लावंड यांच्या कुटुंबातील बहुतांशी सदस्य हे डॉक्टर क्षेत्रात सेवा बजावत आहेत. या निरोप समारंभास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर, माजी नगराध्यक्ष माधवी कदम, डॉ संजोग कदम, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आणि LBS कॉलेज चे प्राचार्य राजेंद्र शेजवळ, माजी अधिकारी सुहास नाडगौडा, सीताराम मोरे, भुजबळ, पुण्याचे उद्योगपती संपतराव थोपटे, काटे, टेल्कोचे जनरल मॅनेजर यादव, सोलापूरचे प्रतापराव पाटील, न्यायाधीश देसाई मॅडम, चव्हाण, अरविंद कदम, शाहीर वैभव फरांदे, सेवानिवृत्त PSI शिवाजी शिंदे, आजी-माजी नगरसेवक, पत्रकार प्रशांत जगताप, आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy