Explore

Search

April 19, 2026 9:41 pm

लेटेस्ट न्यूज़

Satara News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात विविध कार्यक्रम

उमेश चव्हाण यांची माहिती; महोत्सव समिती अध्यक्षपदी माधवराव साठे

सातारा : स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या ओघवत्या वाणीने जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती दि. 1 ऑगस्ट रोजी साजरी होत असून यानिमित्ताने आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष व लोकशाहीर अण्णाभाऊ कृती समितीचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी दिली.

लोकशाहीरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवासंदर्भात झालेल्या शाहू महाराज गृहनिर्माण संस्था आणि विकासनगर येथे झालेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दलितमित्र माधवराव साठे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे, महेश वायदंडे, विष्णू वायदंडे, सौ. मनीषा चव्हाण, प्रफुल्ल घाडगे, सौ. विमल शिंदे, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष अक्षय बाबर, विजय पवार, हेमंत उबाळे, विजय अवघडे, विशाल शिंदे, लखन वायदंडे, आप्पा वायदंडे, अनिल अवघडे सर, विजय तुपे, मयूर दुबळे, विनोद गायकवाड, सौ आरती गायकवाड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी चर्चा करुन रुपरेखा ठरवण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम व व्याख्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवाला जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

वाटेगावहून आणणार क्रांतीज्योत :

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळ आहे. दरवर्षी लोकशाहीर आण्णाभा साठे कृती समितीच्यावतीने वाटेगाव येथे जावून आण्णाभा साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. तसेच त्यांचा विचारांचा जागर क्रांतीज्योत प्रज्वलित केली जाते व ही ज्यात वाटेगावहून साताऱ्यात आणल्यानंतर पोवईनाक्यावर छ. शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकर व लोकशाहीर अण्णाभा साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाते. यावर्षी देखील क्रांतीज्योत आणण्यासाठी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी जाणार असल्याचे उमेश चव्हाण यांनी सांगितले.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy