Explore

Search

April 18, 2025 6:34 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सैन्यभरतीचे आमिष दाखवून जिल्ह्यातील युवकांची ३४ लाखांची फसवणूक

सातारा  : सध्या नोकरी लावतो असे म्हणत युवकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला असून भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे डीआरडीओ बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, या आमिषाने सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती कुडाळ तालुका जावळी येथील राजेंद्र दिलीप भिलारे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत घेत दिली आहे.

सातारा येथे राजेंद्र दिलीप भिलारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी भिलारे यांनी म्हणाले की, हृषिकेश शंकर फाळके, राजेंद्र कालीदास देवकर, तानाजी शंकर देवकर, महेंद्र गजानन शेवते, रवींद्र बाळकृष्ण चव्हाण व चैतन्य तात्यासो तुपे या तरुणांची झालेली फसवणूक प्राथमिक स्वरूपाची आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर व पुणे येथीलही शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे वरील सहा तरुणांची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

कोरेगाव तालुक्यातील एका व्यक्तीने ही फसवणूक केली असून डीआरडीओ, बीएमसी, भारतीय लष्कर, भारतीय रेल्वे येथे कामाला लावतो असे सांगून त्या मुलांचा विश्वास संपादन केला. काही मुलांची कामे केल्याचे भासवून त्यांना कॉल लेटर मोबाईलमध्ये दाखवले. काही मुलांनी त्याला पन्नास हजार रुपये अनामत रक्कम देऊन उरलेली रक्कम वाराणसी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देण्याचे कबूल करण्यात आले. गेली पाच वर्षे संबंधित व्यक्तीकडे आम्ही वारंवार फोन करून पैसे मागत असताना तो टाळाटाळींची उत्तरे देत आहे तसेच जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy