आपल्यापैंकी प्रत्येकाच्या आहारात वाटाणा या भाजीचा समावेश असतो. अनेकवेळा वाटाण्यापासून तयार केलेले विविध पदार्थ व्यक्तींना खाण्यास आवडतात. मात्र हिरव्या वाटाणे पावसाळ्यात आपल्याला मोजक्याचे ठिकाणी ताजे हिरवेगार असे मिळतात. अन्यथा फ्रोझन केलेले वाटाणे बाजारातून विकत घेतात काही लोक. मात्र फ्रोझन वाटण्याची चव ही खऱ्या वाटाण्यासारखी असते मात्र व्यक्तीच्या आरोग्यासाठी फ्रोझन वाटाणे चांगले नसतात.
अनेकदा बाजारात किंवा आपल्या परिसरात वाटाणे मिळत नसल्याने काहीजण फ्रोझन वाटाण्याचा वापर करतात. फ्रोझन वाटाण्याचा आहारात अनेकदा समावेश केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला फ्रोझन वाटाणे खाण्याचे नुकसान माहिती नसल्यास तुम्ही आम्ही सांगत असलेली माहिती नक्की वाचा.
फ्रोझन वाटाणे खाण्याचे दुष्परिणाम कोणते ?
वजन वाढ
जर तुम्ही फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश केल्यास वजन वाढण्याची समस्या वाढते. कारण फ्रोझन वाटाणे अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो परिणामी त्याचा परिणाम हा वजन वाढीवर होतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश करु नका.
पौष्टिक कमतरता
फ्रोझन वाटाण्यात कधीही विविध पौष्टिक गुणधर्मांची कमतरता आढळून येते. फ्रोझन वाटाणे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात.जर तुम्ही लहान मुलांसाठी वाटाण्यापासून कोणताही पदार्थ करणार असाल तर फ्रोझन वाटाण्याचा वापर करु नये.
मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांसाठी
जर तुमच्या घरात मधुमेह आणि बीपीचे सदस्य असतील तर त्यांच्या आहारात फ्रोझन वाटाण्याचा समावेश करु नका. कारण फ्रोझन वाटाण्यात स्टार्च असल्याने रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते. त्यामुळे शक्यतो फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश करु नये.
Author: rayatdarpan
news



