Explore

Search

April 15, 2025 5:41 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

 Bollywood News : सोनाक्षी सिन्हाच सासूबाईंकडून कौतुक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 1 महिना झाला आहे. 23 जुने 2024 मध्ये झहीर – सोनाक्षी यांनी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केलं. लग्नाच्या 1 महिन्यानंतर अभिनेत्रीच्या सासू – सासऱ्यांनी अभिनेत्रीबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. आमच्या मुलाला सोनाक्षी शिवाय दुसरी चांगली जोडीदार भेटलीच नसती… असं म्हणत सोनाक्षीच्या सासू – सासऱ्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. शिवाय इक्बाल कुटुंबात सोनाक्षीची एन्ट्री झाल्यानंतर कुटुंबातील वातावरण कसं आहे… याबद्दल देखील अभिनेत्रीच्या सासूबाईंनी सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, झहीर याचे वडील इक्बाल रतनसी आणि आईने सोनाक्षी खरंच सोनं आहे… असं म्हणाले. ‘झहीर – सोनाक्षी एकमेकांसोबत असल्यामुळे कायम आनंदी असतात. सोनाक्षी आमच्या आयुष्यात मुलगी म्हणून आली तेव्हापासून आम्ही आनंदी आहोत…’

‘झहीर – सोनाक्षी यांना एकत्र पाहिल्यानंतर फार आनंद होते. दोघे एकमेकांसाठी आहेत… अशी भावना मनात निर्माण होते. कोणत्याही नात्यात प्रेमळ भावना असायला हव्यात.. सोनाक्षीकडून कायम आम्हाला आदर आणि सन्मान मिळत असतो. मी झहीरसाठी दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करुच शकत नाही…’ असं देखील झहीर याच्या आई म्हणाल्या आहेत.

‘देवची सदैव तुम्हा दोघांवर कृपा असूदे… मी अशीच प्रर्थना करेल…’, सांगायचं झालं लग्नाच्या 1 महिन्यानंतर सासू – सासऱ्यांकडून कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर सोनाक्षी देखील भावूक झाली. शिवाय अभिनेत्रीच्या डोळ्यातून पाणी देखील आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षी आणि तिच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

संगायचं झालं तर, सोनाक्षी आणि झहीर यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्यामुळे दोघांच्या नात्याला विरोध देखील करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लग्नात उपस्थित नव्हते असं देखील समोर आलं.

पण सोनाक्षीचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. ‘सोनाक्षी कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही… माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे…’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. शिवाय लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये देखील शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी आनंदी दिसले. सोनाक्षीच्या लग्नाला एक महिना झाला तरी, तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy