सातारा : मंगळवार पेठ ते समर्थ मंदिरला जोडणाऱ्या सिटी सर्वे नंबर ४०३, ४०४ येथील वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्या तात्काळ रिकामा करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि. १४ रोजीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा सावित्रा माने यांच्यासह कुटुंबीयांनी दिला आहे.
मंगळवार पेठ ते समर्थ मंदिरला जोडणाऱ्या सिटी सर्वे नंबर ४०३, ४०४ मध्ये अनेकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे आम्हा माने कुटुंबाचा वहिवाट रस्ता बंद झाला असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सातारा नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित विभागाकडून याबाबत दखल घेतली जात नाही. या अडथळ्यामुळे स्वातंत्र्य सैनिक कै. गणू माने यांचा मृतदेह झोळीतून न्यावा लागला. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची अशी अवहेलना होत असले तर सैनिकी जिल्हा कसे म्हणावे. त्यामुळे दि. १३ ऑगस्टपूर्वी ही अतिक्रमणे हटवावीत अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा माने यांनी दिला आहे.
