Explore

Search

April 21, 2026 10:35 pm

लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : यशराज फिल्मसकडून ‘मर्दानी-3’ ची घोषणा

मुंबई  :  सिनेसृष्टीत चित्रपटाच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असलेले काही मोजक्याच चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’  चित्रपटाने आपली छाप सोडली होती. काही वर्षापूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग  येणार आहे. मात्र, या सिक्वेल भागाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या ‘मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची  प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती.

‘मर्दानी’  चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी  आहे. ‘मर्दानी’ चा पहिला भाग 2014 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2019 मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या फ्रेंचायझीचा एक मोठा चाहता वर्ग आहे.

मर्दानीच्या पहिल्या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी, यामध्ये सहभागी असलेले राजकारणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर, दुसऱ्या भागात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी वृत्ती, त्यांना नेहमीच पायाची धूळ समजणाऱ्या पुरुषसत्तावादी प्रवृ्त्तींवर भाष्य करण्यात आले होते. आता, ‘मर्दानी’च्या तिसऱ्या भागात कोणत्या विषयाला हात
टाकण्यात येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

‘मर्दानी’च्या पहिल्या भागाला 10 वर्ष पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने आज, यशराजने टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा केली. मात्र, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, राणी मुखर्जी कोणत्या मोहिमेवर याबाबत ‘यशराज फिल्मस’ने कोणतेही भाष्य केले नाही.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy