Explore

Search

April 19, 2026 6:13 pm

लेटेस्ट न्यूज़

Satara News : वीणा काशिद यांची विद्युत निर्देशक पदी  निवड

सातारा :  सातारा जिल्ह्यातील ट्रान्सवुमन  वीणा काशीद यांची व्यवसाय तंत्रशिक्षण विभाग, पुणे येथे विद्युत निर्देशक पदी निवड झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्स वुमन ठरल्या आहेत.

समाजात वावरताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरीही प्रतिकुल परीस्थितीवर मात करीत, महाराष्ट्र शासन, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या विद्युत निर्देशक पदासाठी त्यांची निवड झाली आहे. अशारीतीने त्या शासन सेवेत दाखल झाल्या आहेत.

सहायक आयुक्त समाजकल्याण सातारा कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वीणा यांचा आदर्श घेऊन हुशार, होतकरु तृतीयपंथीयांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत निवड होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy