Explore

Search

April 19, 2026 9:27 pm

लेटेस्ट न्यूज़

Karad Ganesh Visarjan : कराडात पोलीस व गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने-सामने

परिसरात तणाव

कराड : गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराडमध्ये मोठा उत्साह होता. रात्री 12 नंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली. एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या मागणीवरून चावडी चौकातच काही काळ ठिय्या मारला होता. त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी संबंधित मंडळास पुढे जाण्यास सांगितले.

मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना चावडी चौकातून कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कराडला सकाळी दहा वाजल्यापासून गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

कराडमधील मुख्य चावडी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विविध मंडळांकडून झांजपथक, पारंपरिक वाद्य यांना पसंती दिल्याचे दिसून आले. रात्री बारानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, स्पीकर लावण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री बारानंतर आलेल्या गणेश मंडळांना स्पीकर व वाद्य वाजवणे बंद करावे, असे आवाहन केले. कराडमधील चावडी चौकात एका गणेश मंडळाने आम्हाला बारानंतर एक तरी गाणे वाजू द्या, असा हट्ट धरून काही काळ तेथे ठिय्या मारला होता.

त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक ठाकूर यांनी रात्री बारा वाजल्यानंतर एकही गाणं वाजवता येणार नाही पुढे चला, असे आवाहन मंडळाला केले. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करन त्यांना कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ चावडी चौकात तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही कालावधीनंतर तो तणाव निवळला आणि पूर्ववत विसर्जन सुरू झाले.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy