Explore

Search

April 24, 2025 4:59 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : कोडोलीत युवकासह मित्राला बेदम मारहाण

सातारा : गाडीवरून येताना चुकून धक्का लागल्याचे निमित्त झाल्याने आठ जणांनी दोघांना रॉडसह लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक तीन रोजी रात्री अकरा वाजता कोडोली येथील राजेश चायनीज सेंटर समोर घडली आहे. या मारहाणीत लवप्रीत हिरमेशलाल सफरा वय 22 राहणार गायत्री कॉलनी, एमआयडीसी, कोडोली मूळ राहणार बादरपुर पंजाब व त्याचा मित्र नवप्रीत हे जखमी झाले आहेत.

लवप्रीत आणि नवप्रीत रात्री अकरा वाजता कोडोली येथे चायनीज सेंटर मध्ये फ्राईड राईस आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्कूटरवर बसलेल्या एकाला त्यांचा धक्का लागला. त्या रागातून रोहन रवींद्र भोईटे, प्रथमेश प्रशांत माने दोघेही रा. कोडोली या दोघांसह इतर पाच ते सहा लोकांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ दमदाटी करून बेदम मारहाण केली. तसेच रॉडने मारहाण झाल्याने फिर्यादीचे दोन दात पडले आणि ओठाला जखम होऊन सहा टाके पडले. नवप्रीत याला सुद्धा कठीण वस्तूने मारहाण करण्यात आली. ते दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस हवालदार गुरव अधिक तपास करत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy