Explore

Search

April 21, 2026 10:32 pm

लेटेस्ट न्यूज़

Crime News : वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून तीन जण बेपत्ता

सातारा : सातारा शहरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सागर लक्ष्मण खवले रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा हे राहत्या घरातून मी बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, संभाजीनगर, कोडोली येथून एक वीस वर्षीय युवती घरामधून देवी पाहण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, शाहूपुरी परिसरातून एक 27 वर्षीय महिला राहत्या घरातून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy