Explore

Search

April 8, 2025 2:46 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : ब्रेकअपनंतरही सुष्मितासोबत नातं ठेवण्याबद्दल एक्स बॉयफ्रेंड स्पष्टच बोलला..

जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी ब्रेकअप केलं. 2021 मध्ये सोशल मीडियावर जाहीरपणे पोस्ट लिहित सुष्मिताने ब्रेकअपची माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं. रोहमन सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांसोबतही वेळ घालवताना दिसतो. ब्रेकअपनंतरही मैत्री कायम ठेवण्याबद्दल रोहमन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल तिच्या मुलगी रेनी आणि अलिशा काय विचार करतात याविषयीही त्याने सांगितलं.

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोहमन म्हणाला, “मी जेव्हा तिला भेटलो, तेव्हा मला जाणवलं की तिला ज्याप्रकारे दाखवलं जातं, त्याहीपेक्षा ती खूप चांगली आहे. मी तिचा चाहता होतो पण आता मी ‘प्यारवाला’ (प्रेमात पडलेला) चाहता आहे. ती किती मेहनत घेते हे मला माहित आहे. मी तिच्या मानसिकतेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या अवतीभवती काय चालू आहे हे तिला नीट माहित असतं. आमच्यात अजूनही मैत्री आहे कारण माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर आहे. मला तिच्याकडून या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. एक्स बॉयफ्रेंड असूनही मैत्री ठेवण्याबद्दल लोक बोलतात, पण जर तुमच्यात बोलण्यासारखं काही साम्यच नसेल तर तुम्ही मित्र कसे असू शकता?”

सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबद्दल तो पुढे म्हणाला, “आम्ही एकमेकांसाठी डाळ-भातासारखे आहोत. या नात्यात एक कम्फर्ट आहे. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समजून घेतो आणि लोक काय म्हणतात किंवा विचार करतात याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. मी त्यात पडतच नाही. माझ्या नात्याबद्दल मी लोकांना स्पष्टीकरण देऊ शकत नाही. पण आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”

यावेळी रोहमन सुष्मिताच्या मुलींबद्दलही व्यक्त झाला. “अलिशा आणि रेनी या दोघी खूप हुशार आहेत. कारण त्यांची जडणघडणच तशी झाली आहे. ते समजून घेतात. आम्हीही त्यात कधी पडत नाही. त्यांची आई आणि माझ्यातील नातं ते समजून घेतात. सुष्मितासोबत असलेल्या माझ्या नात्याचा वेगळा विचार न करता ते माझ्यासोबत मोकळेपणे वागतात. आमचं नातं सुरुवातीपासून असंच आहे. त्या दोघी खूप हुशार आणि समजूतदार आहेत. त्याचं श्रेय त्यांच्या आईला जातं. आयुष्य कसं जगायचं हे तिने त्यांना शिकवलं आहे”, अशा शब्दांत रोहमन व्यक्त झाला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy