मुंबई : कपूर फॅमिलीने राज कपूर यांचा १०० वा जन्मदिवस साजरा केला. या कार्यक्रमात चित्रपट इंडस्ट्रीतील तमाम कलाकार उपस्थित होते. या खास दिनी १३ ते १५ डिसेंबर पर्यंत राज कपूर फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे, ज्यामध्ये क्लासिक चित्रपट दाखवण्यात येतील.
भारतीय चित्रपटाचे शोमॅन राज कपूर यांच्या आठवणीत आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात संपूर्ण कपूर फॅमिली एकत्र दिसली. संपूर्ण कपूर परिवाराशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील तमाम स्टार्सनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी एव्हरग्रीन रेखा यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. यावेळी रेखा भावूक झालेल्या दिसल्य़ा. राज कपूर यांच्या पोस्टरसमोर अश्रू पुसत त्यांनी हात जोडून नमस्कार केला.
त्यांच्या आग, बरसात, श्री ४२०, बॉबी, राम तेरी गंगा मैली, संगम, सत्यम शवम, प्रेम रोग अशा चित्रपटांमध्ये नरगीस, वैजयंतीमाला यारसारख्या अभिनेत्रींनी अभिनय करून नाव कमावले.
पीएम नरेंद्र मोदींनी राज कपूर यांना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं, ‘आज आम्ही महान दिग्दर्शक, निर्माते, दूरदर्शी अभिनेते आणि सदाबहार शोमॅन राज कपूर यांची १०० वी जयंती आहे. त्यांचया प्रतिभाने अनेक पिढींवर प्रभाव टाकला आहे. भारतीय आणि वैश्विक सिनेमावपर आपली अमिट प्रतिमा सोडली आहे.’
आलिया भट्टने रेड कार्पेटवर लावली हजेरी
रेखा यांनी अभिनेत्री आलिया भट्टसोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली. आलिया पांढऱ्या साडीत खूप सुंदर दिसत होती.
