बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरी केला. यानिमित्तानं अंबानी कुटुंबानं गुजरातच्या जामनगरमध्ये एका भव्या पार्टीचे आयोजन केले. त्या पार्टीला पाहता सगळ्यांना वाटलं की सलमानचा वाढदिवस नाही तर दिवाळी साजरी करण्यात आली आहे. या निमित्तानं दिवाळी सेलिब्रेशनसारखे फटाके फोडण्यात आले.
सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब हे चार्टर्ड प्लेननं जामनगरला गेलं होतं. या चार्टर्ड प्लेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. स्वत: सोहेल खाननं या चार्टर्ड प्लेनमध्ये कोण-कोण पाहुणे होते. त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते सगळे शुक्रवारी दुपारी जामनगर विमानतळावर पोहोचले. तर सोहेलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खानची आई सलमा खान, सावत्र आई हेलन, अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि सलमानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर. याशिवाय सलमानच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिता देखील या प्लेनमध्ये दिसल्या. त्यांच्यासोबत या निमित्तानं बॉडीगार्ड शेरा देखील दिसला.
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका लाइनमध्ये बऱ्याच गाड्या या जामनगर विमानतळावरून रिलायन्स टाईनशिपकडे जाताना दिसत आहे. अंबानी कुटुंबानं जामनगरमध्ये सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फटाके फोडण्यात आले खूप सजावट करण्यात आली. आतमध्ये जे सेलिब्रेशन झालं त्याचा व्हिडीओ काही समोर आलेला नाही. या पार्टीत सलमानची हिट झालेली गाणी आणि मिका सिंगची गाणी वाजवण्यात आली होती. तर आणखी एका गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे की अंबानींच्या भिंतीवर भाईका बड्डे आणि हॅपी बड्डे भाई असं लिहिण्यात आलं होतं.
सलमानचा वाढदिवस जामनगरमध्ये कसा साजरा करण्यात आला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटसोबत त्याचं खूप चांगलं नातं आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून एक गोष्ट समोर येते ते म्हणजे अंबानी कुटुंब आणि सलमानच्या कुटुंबात खूप चांगलं नातं आहे.
