Explore

Search

September 27, 2025 5:00 am

लेटेस्ट न्यूज़

Web Series : ओटीटी वर गाजतेय ‘स्क्विड गेम’ खतरनाक सीरीज

ॲक्शनने खचाखच भरलेली !

मुंबई :  प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून एका सीरिजची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही सीरीज रिलीज झाली आणि ओटीटीवर ट्रेंडही करत आहे. खतरनाक थ्रिलर आणि दमदार ॲक्शनने भरलेली ही सीरीज सध्या चांगलीच गाजत असून सोशल मीडियावरही सीरीजचा डंका आहे.

ही सीरीज दुसरी तिसरी कोणती नसून ‘स्क्विड गेम’ आहे. जी सध्या OTT वर ट्रेंड करत आहे. ही सिरीज ह्वांग डोंग-ह्युक यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे आणि प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या सीरिजमध्ये कोरियन अभिनेते अनुपम त्रिपाठी, ओह येओंग-सू, वाय हा-जून, किम जू-यंग, ली जुंग-जे, जंग हो-यॉन, पार्क हे-सू आणि हे सुंग-ताई आहेत.

ज्यांना ॲक्शन पाहायला आवडते त्यांच्यासाठी ही तर बेस्ट सीरीज आहे. या सीरिजमध्ये एकही भाग असा नाही की ज्यामध्ये लोक मरताना दाखवले गेले नाहीत आणि मृतांची संख्या 400 वर जाते. सध्या ही सीरीज ट्रेंडमध्ये असून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या सीरीजला मिळताना दिसत आहे. ही सीरीज तुम्ही Netflix वर पाहू शकता.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy