Explore

Search

September 27, 2025 4:57 am

लेटेस्ट न्यूज़

कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला ‘४४० व्होल्टचा झटका’

सातारा प्रतिनिधी : भारतीय संघानं ४ विकेट्स राखून दुबईच मैदान मारत घेतला २०२३ च्या घरच्या मैदानातील पराभवाचा बदला.

सातत्याने आयसीसीस स्पर्धेत ट्रॉफी आड येणाऱ्या कांगारुंचा बुक्का पाडत भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची फायनल गाठली आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियान सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या भात्यातून दमदार खेळी आली. कोहली आपलं काम करून गेल्यावर आलेल्या पांड्यानं “मेरे जैसा कोई हार्डच नहीं है” शो दाखवत भारतीय संघाच्या आयसीसी ट्रॉफी आड येणाऱ्या कांगारूंचा चांगलाच समाचार घेतला. केएल राहुल शेवटपर्यंत मैदानात थांबला आणि जड्डूच्या साथीनं त्याने सिक्सर मारत भारतीय संघाला ४ विकेट्स राखून दाबात विजय मिळवून दिला.

फायनल दुबईतच!

दुबईच्या मैदानात भारतीय संघानं वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेच्या फायनलमधीलच नव्हे तर सातत्याने आयसीसीच्या स्पर्धेत भारताचा हिरमोड करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले. त्यामुळेच हा विजय खूप मोठा आहे. याशिवाय भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठल्यामुळे यजमान पाकिस्तानलाही ‘४४० व्होल्टचा झटका’ बसला आहे. कारण आता यजमान पाकिस्तान असले तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनलही दुबईच्या मैदानातच खेळवली जाईल.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy