“भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड”
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रबळ दावेदार असला तरी न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचे त्यांच्यापुढे फायनलमध्ये अवघड आव्हान असल्याचे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. भारताने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामन्याआधी ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडने भारताला चार गडी राखून नमविले होते. बोलताना शास्त्री म्हणाले की, भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड आहे. भारत दावेदार असला तरी त्याचा अधिक लाभ होणार नाही. २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड ने भारताला चार गडी राखून नमविले होते.
‘टीम इंडियाच्या उणिवांचा फायनलमध्ये लाभ घेऊ’ :
भारताकडून साखळी सामन्यात झालेल्या पराभवातून चांगला धडा घेतला आहे. पराभवाचे शल्य असल्याने फायनलदरम्यान रोहितच्या संघातील उणिवांचा लाभ घेऊ, असे न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याने म्हटले आहे. यंगने डेवोन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांच्या सोबतीने न्यूझीलंडला अनेकदा चांगली सुरुवात करून दिली. ३२ वर्षांचा यंग म्हणाला, ‘साखळीतील पराभवातून आम्ही धडा घेतला. भारतीय फलंदाजांचे खेळण्याचे तंत्र आम्ही समजून घेतले. त्यावर तोडगा काढण्यात यश मिळेल अशी करण्याचा प्रयत्न असेल.’ अपेक्षा आहे. उभय संघांत झालेल्या अनेक रोमांचक सामन्यांचा मी साक्षीदार आहे. जो संघ रविवारी चांगला खेळेल तो जिंकेल. फायनलमध्ये दडपणातही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल.
