दिशा सालीयन यांच्या वडिलांनी नव्याने हायकोर्टात सदर केलेली याचिका ;
सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या याचिकेवर अनेक प्रश्न उद्भवत आहेत . या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, दिशा अशी आत्महत्या करणं शक्यच नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय. माजी महापौर किशोरी पेडणेकर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं, आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या, असंही याचिकेत म्हटलं आहे.
या प्रकरणी विशेष सरकारी वकिल नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, असंही सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ;
दिशा सालियन हत्या प्रकरणात गेल्या ५ वर्ष पासून मला त्रास देण्याचे सतत चालू आहे . कोर्टात जे होईल ते होईल पण गेल्या ५ वर्षे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे . कोर्टात उत्तर देऊ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे असे सांगण्यात आले.
