2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
CBSE Pattern : 2025-26 या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न (CBSE Pattern) लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलासाठी अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे. मात्र, अचानक अशा प्रकारे शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आणि तो दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार एवढीच माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणे बाकी आहे..
