रेपोरेट 25 बेसेस पॉईंटने घट, EMI कमी होणार, गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता.
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महागाई नियंत्रणात असल्याचे आणि गुंतवणुकीला गती मिळाल्याचे सांगितले.
सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि दिलासा दायक बातमी आता समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर झालं असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर बँकांच्या लोनचा हप्ता ठरवला जातो. रेपो रेटमध्ये 25 बेसेस पॉईंटने घट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 6 टक्के झाला आहे. ज्याच्या परिणाम हा व्याज दरावर होऊन EMI कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या दरकपातीची घोषणा केली. वाढत्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, टॅरिफमुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने निर्माण होत आहेत.
रेपो रेट घटल्यामुळे कोणाला फायदा होणार?
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांना देखील गृह कर्जावरील व्याज घटवावं लागू शकतं. जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं. याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात 5-25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

Author: rayatdarpan
news