सातारा ; प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली, याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे…
