एका मेंढपाळाच्या मुलाने UPSC परीक्षेत देशात 551वी रॅंक मिळवून .क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे याची जिल्ह्यात काय पण देशात चर्चा आहे.
सातारा प्रतिनिधी ; आजचा संघर्ष या उद्याच्या यशाची पाऊलखुणा असतात. शहरापासून दूर गावाखेड्यात आलेल्या तरुणांसाठी हा संघर्ष खूप मोठा असतो. प्रामणिकपणे केलेला संघर्ष ,हे कधीच वाया जात नाही. बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने सिद्ध करुन दाखवले आहे. युपीएसच्या परीक्षेत तो देशात 551वी रॅंक मिळवला आहे. यूपीएससीचा निकाल लागला. बिरदेव पास झाला. त्यावेळेस तो त्यांच्या कुटुंबासोबत मेंढ्या चारायला गेला होता. कोल्हापूरचा धनगर समाजाचा तरुण आयपीसएस झाल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे.
2024 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 22 एप्रिल रोजी दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचं समजताच त्याच्या जन्मगावी कागल तालुक्यातील यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला. निकाल लागल्यानंतर बिरदेव सीमाभागात असलेल्या मेंढपालावर पोहोचला. त्यानंतर त्याचा नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याच ठिकाणी सीमाभागातील सामाजिक कार्यरकर्त्यांनी देखील त्याला भेट दिली. त्याचा सत्कार केला. बिरदेव जन्मगावी परतल्यानंतर मोठी जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कशी केली युपीएससीची तयारी…
बिरदेवने शिक्षण सुरू असताना यूपीएससी परीक्षेबाबत माहिती घेण्यास सुरुवात केलेली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. यासाठी बिरदेव दिल्ली येथे गेला. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी यूपीएससीचा क्लास सुरू केला. वाझेराम या क्लासमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. दिल्लीतल्या अभ्यासिकांमध्ये रात्रंदिवस अभ्यास करायचा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय त्याच्या पदवीच्या शिक्षणापेक्षा वेगळे होते. यासाठी त्यांना कसून अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रत्येक विषयाची एक ते दोन पुस्तकं त्याने वाचून काढली होती. तसेच जो विषय अवघड असेल त्याबाबत अधिक संदर्भ साहित्य घेतलेले होते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही लेखी परीक्षांसाठी विविध तज्ज्ञांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं होतं. मुलाखतीमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं. परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केलं.
