Explore

Search

September 27, 2025 5:00 am

लेटेस्ट न्यूज़

HSC Exam Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के

CBSE 12th result 2018: Topper list, Pass precentage, merit list out; Meghna Srivastava from Ghaziabad tops - Education News | The Financial Express
कोकण विभाग अव्वल आला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा लातूर विभागाचा निकाल लागला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतील. त्याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निकाल सांगण्यात आला असून या वर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभाग अव्वल आला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा लातूर विभागाचा निकाल लागला आहे.

राज्यात बारावीचा निकाल यंदा 91.88% लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.  यापैकी 13 लाख 2873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  यंदा देखील बारावीच्या निकालातून मुलींनी बाजी मारली असून  मुलींचा निकाल 94.98% इतका कर मुलांचा निकाल  89.51% इतका लागला आहे.

यामध्ये  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74% इतका तर   तर लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89.46% निकाल लागला. एकूण 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा निकालाचा टक्का घसरला असून  फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता तर आत्ता फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के  लागला आहे.

बारावीचा निकाल, विभागनिहाय निकालात कोण आघाडीवर?

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाला पाहता येणार आहेत. सध्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली.

विभागनिहाय निकाल (HSC result 2025  Region Wise Result Statistics)

पुणे – 91.32%

नागपूर – 90.52%

संभाजीनगर – 92.24%

मुंबई – 92.93%

कोल्हापूर – 93.64%

अमरावती – 91.43%

नाशिक – 91.31%

लातूर – 89.46%

कोकण – 96.74%

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy