Explore

Search

September 27, 2025 4:59 am

लेटेस्ट न्यूज़

मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी पडले ट्रॅकवर , 5 जणांचा मृत्यू !

<div class="paragraphs"><p>Five people have lost their lives after falling from a fast local train in Mumbai. (Representational image: PTI)</p></div>
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमधून 5 प्रवासी खाली पडल्याची घटना घडली आहे.

मुंबई प्रतिनिधी ; दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमधून 5 प्रवासी खाली पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये या 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुष्पक एक्स्प्रेस लखनौला जात असताना ही घटना घडली.10 ते 12 प्रवासी एक्स्प्रेसमधून खाली पडल्याची माहिती मिळत असून यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

दरवाजाला लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. कसाऱ्याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्स्प्रेस बाजूनेच जात होत्या. त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले, हे समजू शकलेलं नाही. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

5 ते 10 प्रवासी दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान पडलेले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात आहे. प्रवाशांना रुग्णालयात घेऊन जात आहोत. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्याशी बातचीत झाली की ते प्रवासी कुठल्या गाडीमधून प्रवास करत होते आणि कुठल्या कारणामुळे पडले याची शहानिशा मध्य रेल्वेतर्फे केली जाईल. मध्ये रेल्वेची वाहतून सुरळीत सुरु आहे. वाहतूकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy