Explore

Search

April 3, 2026 1:04 am

लेटेस्ट न्यूज़

बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक यांचा ठाकरेंना मोठा धक्का : दगडू सकपाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश !

ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र. 203 मधून इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आजचा दिवस शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्टावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कडवट कार्यकर्त्यांचा विचारही उबाठा गटात केला जात नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला. दगडू सकपाळ यांनी खऱ्या अर्थाने मुंबईच्या शिवसेनेचा पाया आहे. दगडू सकपाळ यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली. आता लालबागचा राजा आणि मुंबई च्या राजाचा आर्शीवाद मिळाला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

दगडू सकपाळ म्हणजे कणखर नेतृत्व असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं. तर गेला की तो कचरा अशा प्रकारचं बदनामी करून काही लोक मोकळे होतात, अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली. बाळासाहेब दगडूदादांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आता घरंगडी समजायला लागले आहेत. घाटकोपरच्या सभेमध्ये दगडूदादांनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदे एक दिवस नक्की मोठा होईल. मी शाखाप्रमुखपासून मुख्यमंत्री झालो, अशी आठवणही एकनाथ शिंदे म्हणाले.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy