सध्या देशातील घडत असलेल्या सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे हा सत्ता संघर्ष कोणत्याही राजकीय पक्षातील नसून धर्म सत्ते विरुद्द्ध राज सत्ते असा आहे. मागील आठवड्यामध्ये मौनी अमावास्ये च्या निम्मित्ताने शाही स्नानास निघालेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना भाजप प्रणीत उत्तर प्रदेश प्रशासनाने स्नानापासून रोखल्यामुळे दोन सत्ता मध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे . अखंड हिंदू समाजाचे आद्यगुरु म्हणून स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणून यांची ओळख आहे
उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे (Badrikashram) विद्यमान शंकराचार्य आहेत. ते सनातन धर्माचे खंदे पुरस्कर्ते असून वाराणसीतील प्रसिद्ध श्री विद्या मठाचे प्रमुख आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये जन्मलेले आणि उमाशंकर उपाध्याय या नावाने ओळखले जाणारे, त्यांनी संन्यास घेतल्यानंतर शंकराचार्य म्हणून कार्यभार सांभाळला। उत्तर प्रदेशातील प्रयागराज माघ मेळ्यात ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि योगी सरकार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये मौनी अमावस्येला गंगा स्नानावरून झालेल्या वादानंतर ते धरण्यावर बसले होते. हा वाद राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे (विशेषतः गो हत्या आणि राम मंदिर मुद्यांवर टीका) अधिक तीव्र झाला आहे . यामुळे भाजपा नेत्यांमध्येच मतभेद दिसत आहेत
वादाची प्रमुख कारणे आणि मुद्दे: गंगा स्नान आणि धरणा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आरोप केला की, प्रशासनाने त्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नान करण्यापासून रोखले, त्यानंतर ते धरण्यावर बसले. राजकीय टीका: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्या राम मंदिराचे “अधुरे” बांधकाम, कुंभमेळ्याचे कुप्रबंधन आणि गोहत्येसारख्या मुद्द्यांवर योगी सरकारवर कठोर टीका केली होती. ‘कालनेमी’ वि. ‘भगवान’ वाद: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अप्रत्यक्षपणे अशा टीकाकारांना ‘कालनेमी’ (राक्षस) म्हटले, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘शंकराचार्य भगवान’ असल्याचे म्हणत त्यांना आदर दिला, ज्यामुळे भाजपामध्येच दोन गट पडल्याचे दिसले आहे प्रयागराज माघ मेळ्यादरम्यान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि मेळा प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद आता केवळ स्थानिक मुद्दा राहिलेला नाही, तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे निकटचे शिष्य मुकुंदानंद ब्रह्मचारी यांनी पुरीचे शंकराचार्य
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेतल्याने या वादाला नवे वळन मिळाले .पुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना {लाडला} म्हणून संबोधून स्वामी निश्चलानंद यांना एक प्रकारे पाठींबा दर्शविला आहे.
तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मोदी ,शहा आणि योगी यांना टीकेचे लक्ष केले आहे
यामुळे तमाम हिंदू समाजातील लोकांमध्ये धर्म मोठा कि पक्ष असा संभ्रम निर्माण झाल आहे .
देशातील हा संघर्ष पाहता धर्म सत्ते विरुद्ध राजसत्ता (मोदी,योगी सरकार ) असा पहिल्यानदाच पाहायला मिळत आहे
हिंदू धर्माच्या नावावर देशाच्या सत्तेत बसणारे आज धर्माला पायदळी तुडवत असल्याची भावना हिंदू संत म्हणत आहेत.
या परिस्थितीत कुणाचा विजय होईल या पेक्षा कोणाचा अंत होईल हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.
संपादकीय .
Author: rayatdarpan
news



