राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अस्ठीचे दर्शन व विसर्जन आज सातारा जिल्ह्यामध्ये करण्यात आले.
सातारा ;प्रतिनिधी
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे अवघ्या महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. या धक्क्यातून सावरणे मोठे कठीण झाले आहे. दादांचा अंत्यविधी बारामती येथे लाखोंच्या उपस्थितीत झाला. अनेकांना तिथपर्यंत पोहोचता आले नाही. दादाप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन दादांचा अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवार, दि. ३ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय सातारा येथे दर्शनासाठी ठेवले होते . अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सामान्य जनतेनी दादांच्या अस्थींचे दर्शन घेतले व आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. राज्याच्या राजकारणामध्ये स्वर्गीय अजित दादांनी आपल्या विचारांचे अनेक शिलेदार तयार केले व त्यांच्यावर राजकीय संस्कार करून त्यांना राजकीय ताकतीच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला.
स्वर्गीय अजित दादांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर राजकारणात समाजकारणात जे सहकारी घडवले त्यांनाच आपलं कुटुंब मानलं, कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे कार्यकर्ता हा कुटुंबातील सदस्य आहे असे मानायचे त्यांच्याच प्रत्येय म्हणून आज स्वर्गीय अजित दादा यांचा अस्थी चे विसर्जन सातारा जिल्ह्यातील युवा नेते श्री अमित दादा कदम यांनी केले. आणि दादांनी केलेले संस्कार व विचार खर्या अर्थाने अखंड पने सामाजात पोहचवण्याची प्रतीज्ञा श्री अमित दादा कदम यांनी केली .आणि स्वर्गीय अजित दादांच्या अस्तिचे विसर्जन आज संगम माऊली येथे करण्यात आले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राजेंद्र जी चोरगे , राजेंद्र लवंगारे , निवास शिंदे, रामगडीया जी, सीमा जाधव , स्मिता देशमुख , कामेश कांबळे. आदी मान्यवर उपस्थित होते .
Author: rayatdarpan
news



