सातारा : शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत 14 वर्षा खालील मुलींच्या गटात के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सातारा येथील इयत्ता 8 वी तील विद्यार्थिनी कु.वेदिका विनोद वाघ हिने धनुर्विद्या (फिटा) या प्रकारात 30 मी, 40 मी ,60 मी, वैयक्तिक आणि सांघिक मध्ये, असे एकूण 5 सुवर्ण पदके प्राप्त केली. तिची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय (National) स्पर्धेसाठी निवड झाली. वेदिकाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण सावंत सर व शाळेचे प्रशिक्षक सुधाकर पळसे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग संचालिका सौ. आँचल घोरपडे, विश्वस्त सौ.उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत मगर, पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक शिक्षकांसह, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
