Explore

Search

April 15, 2025 1:46 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Crime News : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

१३ वर्षीय परप्रांतीय मुलाचा मृत्यू

कराड  : उंडाळे ता. कराड येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात १३ वर्षीय परप्रांतीय मुलाचा मृत्यू  झाला. अंकित गोविंद सिंग असे मृत मुलाचे नाव आहे. स्फोटात पत्र्याचे शेड उडून गेले. गॅस लिकेज झाल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या  माहितीनुसार, बिहार येथील काही परप्रांतीय कुटुंबीय उंडाळे येथे भाड्याने राहतात. उपजीविकेसाठी ते आईस्क्रीमचा व्यवसाय करतात. काही दिवसापूर्वी अंकित उंडाळेत आला होता.

दरम्यानच, आज सकाळच्या सुमारास सिलेंडरच्या टाकीचा अचानक मोठा स्फोट झाला अन् टाकीचे तुकडे अंकितच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यादुर्घटनेत सुदैवाने इतर कोणीही जखमी झाले नाही. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.जी. जाधव करीत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy
20:16